Home अकोले अकोले करोना ब्रेकिंग: आज बुधवारी ७ करोनाबाधित

अकोले करोना ब्रेकिंग: आज बुधवारी ७ करोनाबाधित

Coronavirus Akole seven corona infected

Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात आज बुधवारी दिवसभरात सात करोनाबाधित आढळून आले आहेत. आज सकाळी दोन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी आणखी पाच पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे.

आज दुपारी धुमाळवाडी येथील सात वर्षीय मुलगा व पेंडशेत येथील २७ वर्षाच्या महिलेचा शासकीय अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.

आज सायंकाळी अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत प्राप्त झालेल्या अहवालात पेंडशेत येथील ८१ वर्षीय पुरुष, धुमाळवाडीतील २८ वर्षीय महिला, बहीरवाडी येथील ९० वर्षीय व ४२ वर्षीय महिला तर ३९ वर्षीय पुरुषाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अकोले तालुक्यात आज सात रुग्ण आढळून आल्याने तालुक्याला हादरा बसला आहे. तालुक्यात करोनाबाधितांची संख्या ७३ झाली आहे. ४१ जण करोनामुक्त झाले आहेत. २ मयत तर सध्या ३० जणांवर उपचार सुरु आहेत.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Akole seven corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here