Home क्राईम शिक्षकावर हल्ला करणारा मुख्य सूत्रधार निघाला सुरक्षारक्षक अधिकारीच

शिक्षकावर हल्ला करणारा मुख्य सूत्रधार निघाला सुरक्षारक्षक अधिकारीच

Rahuri mastermind behind the attack on the teacher

राहुरी(Rahuri): चार दिवसांपूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रा. डॉ. राहुल देसले हे विद्यापिठाच्या आवारातून फिरायला जात असताना एका कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला होता.

या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार विद्यापीठाचा सहायक सुरक्षा अधिकारीच निघाला आहे. बुधवारी पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

गोरक्षनाथ शेटे असे या सहायक सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रा. डॉ. राहुल देसले यांनी हल्ल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याबाबत श्रीरामपूरच्या विभागीय अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांनी तपास घेतला आहे.

 प्रा. डॉ. राहुल देसले यांच्यावर हल्ला भास्कर नानासाहेब काचोळे, तोपिक जामीन देशमुख, परवेज सय्यद या आरोपींनी महात्मा फुले विद्यापीठातील सहायक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचे सांगितले. शेटे हा घटना घडल्यापासून पसार होता. त्यास पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. मागील किरकोळ वादातून शेटे याने देसले यांच्यावर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Rahuri mastermind behind the attack on the teacher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here