Home क्राईम संगमनेर: अॅल्युमिनियमच्या ट्रकसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

संगमनेर: अॅल्युमिनियमच्या ट्रकसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

 

Sangamner Police arrested a gang of robbers along with a truck 24 hours

संगमनेर | Sangamner: ट्रक चालक व क्लिनर दोघांना चाकूचा धाक दाखवून झाडाला बांधून १.७३३ टन अॅल्युमिनियम भरलेला ट्रक पळवून नेणाऱ्या पाच दरोडेखोरांना तालुका पोलिसांनी काही तासांतच छडा लावत मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. आणखी तीन आरोपी पसार आहेत.

तालुक्यातील लोहारेच्या लोणी नांदूर शिंगोटे रोडवर बुधवारी दुपारी ही घटना घडली होती. ट्रकवरील चालक अजितकुमार सूर्यदेव यादव व क्लिनर निपुकुमार शिवचरण यादव (बिहार) हे अॅल्युमिनियम भरलेला ट्रक घेऊन झारखंडला चालले होते. दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 वाजता सदरचा ट्रक सुपे येथून लोणी नांदूर शिंगोटे रोडने सिन्नरकडे जाण्यास निघाला असता लोहारे शिवारात दोन मोटारसायकलवरुन पाच आरोपी आले त्यांनी रस्त्यात मोटार सायकली आडव्या लावून ट्रक थांबविला. व त्यापैकी तीन आरोपींनी ट्रक मध्ये बळजबरीने घुसून चालक व क्लीनर यांना सुर्‍याचा धाक दाखवून त्यांना नाशिक जिल्ह्यातील दापुर येथे पुणे-नाशिक रोडवर नेवून ट्रकच्या खाली उतरवून मोटारसायकलवर बसविले व एक आरोपी ट्रकमध्ये थांबून राहिला व इतरांनी ट्रक चालक व क्लीनर यांना दापूर कडे जाणार्‍या रोडवर मतलबी मळा, हाडवळा येथे म्हाळू केदार यांच्या वाट्याने घेतलेल्या शेतात त्यांचे हातपाय बांधून तोंडास चिकटपट्टी बांधून दोरीने बाभळीच्या झाडाला बांधून टाकले. व ट्रक व मुद्देमालासह पसार झाले होते.

तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे हतीने हालवली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपासाची चक्रे गतीने फिरविली.

संगमनेर ते घोटी परिसरातील सर्व हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप पोलिसांनी पिंजून काढले. दरम्यान पांढुर्ली जि. नाशिक येथील संजीवन पेट्रोल पंप येथे आरोपी यांनी लुटलेल्या ट्रकमध्ये डिझेल भरतानाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. तीच संशयाची सुई धरुन मुंबईच्या दिशेने तपास सुरु केला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी महाराष्ट्रातील अधिकार्‍यांच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरुन माहिती तात्काळ प्रसारीत केल्याने राज्यात ठिकठिकाणी नाकेबंदी क़रण्यात आली. आणि त्यातच सदरचा ट्रक अलगदपणे शिळ डायघर, पोलीस स्टेशन मुंब्रा, ठाणे या पोलिसांनी पकडला.

समाधान देविदास राठोड वय २, नकुल धर्मराज ठाकरे वय २१ कोपरगाव, राजेंद्र सोन्याबापू खेमनर वय २४, आदिनाथ विलास गायकवाड वय १९ आश्वी मारुती ठका बिडगर वय २४ डिग्रस या दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sangamner Police arrested a gang of robbers along with a truck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here