संगमनेर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चौघांना अटक
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील तीन बत्ती परिसरात गुरुवारी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना घडली होती. यामध्ये हल्ला करणाऱ्या चार संशियीताना पोलिसांनी शुक्रवारी उशिरा ताब्यात घेतले होते.
मुसेब अलाउद्दीन शेख वय ३१ रा. अपनानगर संगमनेर, असिफ मेहमूद पठाण वय ३१ मोगलपुरा संगमनेर, सय्यद युनुस मन्सूर वय २४ गवंडीपुरा संगमनेर, मोसीन इमाम शेख वय ३५ रा. जम्मानपुरा अशी अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत. तसेच जुबेर हॉटेलवाला व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हानिफ रशीद शेख, अरबाज साजिद सर्व रा. संगमनेर हे अजून फरार आहेत. त्यांच्याविरोधात पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सलमान मुक्तार शेख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्ह्याची नोंद केली आहे. शनिवारी या चार जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहे.
Web Title: Sangamner Police attack four arrested