Home संगमनेर संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडले

संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडले

Sangamner police sub-inspector Rana Pardeshi

संगमनेर | Sangamner: संगमनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांना नाशिक येथील लाचलुचपत खात्याच्या पोलिसांनी एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालदाड रोड याठिकाणी अतिष संजय डमरे यांच्या घरी कोणही नसताना आतिश याने त्याच्याच घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून २ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ३ लाख १२ हजार ५०० रुपयांच्या मुद्धेमाल चोराला होता. त्यांनतर त्याने मित्र सुरज वाघ व त्याची पत्नी निकिता वाघ यांच्या मदतीने नाशिक येथील सोनाराला विकले होते. याप्रकरणी आतीषची आई मंगल संजय डमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी व सचिन उगले याप्रकरणाचा तपास करीत असताना अतिश डमरे व सुरज वाघ यांना गोवा बीचवर पकडले होते. त्यांनतर यात नाशिक येथील एका सराफाचे नाव या प्रकरणात आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राणा यांनी सराफाकडे 2 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानुसार सुरुवातीला एक लाख रुपये देण्याचे ठरले. सराफ मंगळवारी दुपारी परदेशी यांना पैसे देण्यासाठी शहरातील स्टेडीयमजवळ आले असता नाशिक येथील लाचलुचपत पोलिसांनी सापळा रचून परदेशी याला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner police sub-inspector Rana Pardeshi caught red-handed taking bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here