Home संगमनेर संगमनेरात एक हजार गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला

संगमनेरात एक हजार गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला

Sangamner Caught a tempo carrying a thousand beef

संगमनेर | Sangamner: नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील सायाखींडी फाटा येथे रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास संगमनेर पोलिसांनी सापळा रचत गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला.

त्यातील एक हजार किलो गोमांससह ४ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांनी मुंबईतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहनवाज मोहमद हुसेन कुरेशी वय २० रा. कुर्ला, मुंबई व इसायातिक अहमद कुरेशी वय २५ रा. मुंबई असे या दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

रविवारी मध्यरात्री संगमनेरातील साखळी कत्तल खाण्यातून गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल करून एका टेम्पोतून त्यांचे मांस मुंबईकडे नेले जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी पुणे नाशिक महामार्गावर सायखींडी फाटा येथे सापळा लावून संशियत वाहन पकडले. त्या वाहनाची तपासणी केली असता गोवंश मास असल्याचे पोलिसांना आढळले.पोलिसांनी टेम्पोसह मांस ताब्यात घेत दोघांना अटक केली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Caught a tempo carrying a thousand beef

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here