Home क्राईम संगमनेर: पोलीस असल्याचे बनाव करून चोरट्याने तीन तोळ्याची सोन्याची चैन लांबविली

संगमनेर: पोलीस असल्याचे बनाव करून चोरट्याने तीन तोळ्याची सोन्याची चैन लांबविली

Sangamner Pretending to be a policeman, the thief pulled out gold Chain

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात एका हॉटेलजवळ मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास एका ६० वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याचे भासवून भामट्याने या व्यक्तीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन हातातील घडयाळ लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत नामदेव दादाभाऊ बोडके वय ६० रा. म्हसवंडी ता. संगमनेर यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगळवारी सकाळी बोडके हे दुचाकीहून जात असताना एक अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आली. मी पोलीस आहे. चेकिंग चालू आहे. असे तो अनोळखी व्यक्ती त्या बोडके यांना म्हणाला. त्याने बोडके यांच्या हातातील घडयाळ, सोन्याची चैन काढल्याला सांगितली. या वस्तू रुमालात ठेवून तो रुमाल बोडके यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्याचे त्याने भासविले. त्यानंतर पोलीस अशी ओळख सांगणारी व्यक्ती निघून गेली. काही वेळाने बोडके यांनी डिक्की खोलून रुमाल उघडा करून पाहिला असता चैन व घडयाळ नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने घारगाव पोलीस ठाणे गाठत सर्व हकीकत सांगितली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Sangamner Pretending to be a policeman, the thief pulled out gold Chain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here