संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप पलटून झालेल्या अपघातात 22 जण जखमी
संगमनेर | Accident: पुणे नाशिक महामार्गावर बोटा बायपास जवळील दुभाजकावर पिक अप पलटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. लोणी येथून पुणे येथे वलीमासाठी जात असताना दुचाकीस्वराला वाचविताना हा अपघात घडला. जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिकअपधील सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य होते. पुणे येथे नातलगांच्या वलीमासाठी ते जात होते. पुणे नाशिक महामार्गाने पुण्याकडे जात असताना अपघातप्रवण क्षेत्र बनलेल्या बोटा बायपास वरील दुभाजकाजवळ येताच अचानक एक दुचाकीस्वर आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पिकअप महामार्गावर पलटी झाला. घटनेनंतर जखमींना तातडीनं आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. 15 जणांची प्रकृतीती गंभीर असून इतरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.
Web Title: Sangamner Pune-Nashik highway pickup overturning accident