Home अहमदनगर जिल्ह्यात बस धावली मात्र तीन बसवर दगडफेक, चालक जखमी

जिल्ह्यात बस धावली मात्र तीन बसवर दगडफेक, चालक जखमी

Ahmednagar bus ran in the district but three buses were pelted with stones

अहमदनगर | Ahmednagar: सरकारने पगारवाढ जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे काही कर्मचारी कामावर येण्यास  सुरुवात झाली आहे.शेवगाव आगाराच्या तीन बसेसवर दगडफेक झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेवगाव बस आगारातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला. मात्र आज शेवगाव आगाराच्या तीन बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक करण्यात आली आहे.

शेवगावकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या बसवर (एमएच ४० वाय ५४२८) अज्ञात इसमाने तालुक्यातील अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली. श्रीरामपुरकडे जाणाऱ्या बसवर (एमएच ४० एन ८८९५) सौंदळा (ता. नेवासा) येथे, तसेच शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या एमएम ४० एम ८७५२ या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे जखमी झाले आहेत.

Web Title: Ahmednagar bus ran in the district but three buses were pelted with stones

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here