Home अहमदनगर पोलीस नाईक १० हजाराची लाच घेताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात

पोलीस नाईक १० हजाराची लाच घेताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात

Police naik caught taking bribe of Rs 10,000

श्रीरामपूर | Bribe Case:  शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यास १० हजाराची लाच (Bribe) घेत असताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना आज सकाळी घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय दुधाडे असे पोलीस नाईक याचे नाव आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलीस नाईक संजय दुधाडे याने तक्रारदारकडून २० हजारांची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केल्याने लाचालुचत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडसने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह,पोलीस हवालदार सचिन गोसावी,प्रफुल्ल माळी, प्रभाकर गवळी, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात १० हजार रुपयांची लाच घेतांना पोलीस नाईक दुधाडे यास रंगेहाथ पकडले.लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाई नंतर पोलीस नाईक दुधाडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  कारवाईमुळे शहर पोलिसांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

दरम्यान मागील काही आठवड्यांपूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील एक हेडकॉन्स्टेबलला लाच लुचपत विभागाने पैसे घेतांना रंगेहात पकडले होते.

Web Ttile: Police naik caught taking bribe of Rs 10,000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here