Home संगमनेर संगमनेर शहरालगतलगत गुंजाळवाडीत सात दिवसांचा जनता कर्फ्यु

संगमनेर शहरालगतलगत गुंजाळवाडीत सात दिवसांचा जनता कर्फ्यु

Sangamner Seven-day public curfew in Gunjalwadi

गुंजाळवाडीत दिनांक ३० एप्रिल पासून  ७  मे पर्यंत कडक जनता कर्फ्यु.: सरपंच वंदनाताई विलास गुंजाळ

संपादन: ज्ञानेश्वर गायकर पाटील

संगमनेर: तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून गुंजाळवाडी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते,  राजकीय दृष्ट्या सक्षम ,एक विकसित ग्रामपंचायत असून संगमनेरचा अर्धा नागरी भाग या ग्रामपंचायत अंतर्गत मोडला जातो. सुमारे तीस हजार लोकसंख्येचे विस्तृत अशी नागरी वस्ती असून सरपंच वंदनाताई गुंजाळ व उपसरपंच नरेंद्र गुंजाळ यांचेसह सर्वच ग्रामपंचायत सदस्य जागरूकतेने गावगाडा हाकत आहेत.

कोरोना चा प्रादुर्भाव ग्रामीण भागात ही जोरात फोफावला असून, आता पर्यंत कोरोना चे ८६ रुग्ण आढळले असून ,गाव बाधित क्षेत्र म्हणून शासकीय नियमानुसार घोषित करण्यात आले आहे.

सरपंच वंदनाताई विलास गुंजाळ पाटील यांच्या उपस्थित नुकतीच ग्राम आरोग्य सुरक्षा समितीची बैठक होऊन , पुढील प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण नागरी भागात दिनांक ३० एप्रिल ते ७ मे पर्यंत जनता कर्फ्यु लावण्यात येवा असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या काळात हद्दीतील हॉस्पिटल्स , मेडिकल दुकाने, दूध डेरी वगळता सर्व आस्थापनांमध्ये कामकाज बंद राहील, यात मुख्यतः हॉटेल्स, बांधकामे, यांच्या सह भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, प्रवासी वाहतूक रिक्षा, सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात फिरणारे नागरिक  यांना बंदी  असणार असून ,सर्व नागरिकांना दवंडी द्वारे सूचना दिली गेली असल्याचे सरपंच वंदनाताई गुंजाळ यांनी सांगितले. जनता कर्फ्यु वर ग्राम सुरक्षा समिती बारीक लक्ष ठेऊन असून, ग्रामपंचायत सदस्य जागरूकतेने प्रत्येक वॉर्ड मध्ये लक्ष ठेवणार असून नागरिकांचे प्रबोधन ही करणार असल्याचे उपसरपंच नरेंद्र गुंजाळ पाटील यांनी सांगितले.

ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी यांनी काल पासूनच जनजागृती ला सुरवात केली असून प्रत्येक नागरी वस्तीमध्ये जाऊन  नागरिकांना प्रबोधन करत आहेत, असे ग्रामविकास अधिकारी कोल्हे यांनी सांगितले आहे.

गुंजाळवाडी परिसरात लसीकरण बाबत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आढावा घेत असल्याचे कामगार तलाठी तोरणे यांनी सांगितले तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या बाबत नागरिकांनी जनता कर्फ्यु काळात सहकारी करावे , तसेच मॉर्निंग वॉक व सायंकाळी फिरणाऱ्या लोकांना कायदेशीर कारवाई चा बडगा उगारला जाईल असे कामगार पोलीस पाटील गणेश म्हस्के यांनी सांगितले.

गुंजाळवाडी येथे लसीकरण मोहीम गुंजाळवाडीत आरोग्य केंद्रात केले जावी अशी मागणी  तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विलास गुंजाळ पाटील यांनी आरोग्य विभागाकडे केली असल्याचे सांगितले.

नागरिकांनी कोरोना महामारीला थोपवण्याकरिता ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे जाहीर निवेदन ग्रामसुरक्षा समितीने केले असून, पालन न करणाऱ्या नागरिकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे ही पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Sangamner Seven-day public curfew in Gunjalwadi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here