Home क्राईम संगमनेरात मुन्नाभाई डॉक्टर पदवी नसताना रुग्णांची तपासणी करणारा अटकेत

संगमनेरात मुन्नाभाई डॉक्टर पदवी नसताना रुग्णांची तपासणी करणारा अटकेत

Sangamner Detainee examining patient without degree

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथील एक व्यक्ती कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर उपचार करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे हे कोरोना पार्श्वभूमीवर मंगळवारी संगमनेर तालुक्यात आढावा बैठकीसाठी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना निमगाव भोजापूर येथे एक व्यक्ती कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समजले. त्यांनी सखोल चौकशी अंती त्याचे नाव शैलेश कडलग असल्याचे समोर आले.

याबाबत प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी कायद्शीर कडक कारवाईचे निर्देश दिले.

घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शैलेश कडलग विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.एस. पाटोळे हे पुढील तपास करीत आहे.

Web Title: Sangamner Detainee examining patient without degree

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here