Home संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर घारगाव परिसरात शिवशाही बस व दुचाकीत भीषण अपघात एक...

पुणे नाशिक महामार्गावर घारगाव परिसरात शिवशाही बस व दुचाकीत भीषण अपघात एक ठार

Sangamner Shivshahi Bus and Bike Accident one death

संगमनेर | Sangamner: पुणे नाशिक महामार्गाच्या घारगाव परिसरात शिवशाही बस व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला.

या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडला.

या अपघातात तानाजी पवार हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिक पुणे शिवशाही बस क्रमांक एम. एच. १४  जी.यु. ०६४२ या बसने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करून दिली आहे. तर जखमींना रुग्णालयात पाठविले आहे. पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

Web Title: Sangamner Shivshahi Bus and Bike Accident one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here