राज्यपालांकडून सोमनाथ गिते यांच्या व्यसनमुक्ती लिखाणाची दखल
संगमनेर | Sangamner: महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सोमनाथ गिते यांनी मागील काही काळापासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. याची दखल घेत माननीय राज्यपाल कोश्यारी म्हणाले की सोमनाथ गिते समाजासाठी चांगले काम करत आहेत.
वर्तमानपत्रे व अन्य काही माध्यमांतून त्यांनी व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव मांडले आहे. गिते यांच्या याच कामाचे कौतुक कोश्यारी यांनी एका पत्राद्वारे करताना म्हटले कि समाजामध्ये व्यसनाचे भीषण परिणाम दिसत आहेत. व्यसनाचे दुष्परिणाम एकट्या व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. तुम्ही केलेल्या लिखाणाचा फायदा समाजाला होत आहे. शाळा, महाविद्यालयांत व्यसनमुक्त विद्यार्थी घडण्यासाठी याचा फायदा होईल असेही राज्यपालांनी म्हटले आहे. यापूर्वी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनीही गिते यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक केलेले आहे.
Web Title: Sangamner Somnath Gite’s de-addiction note from the Governor