Home Accident News संगमनेर: आंबी खालसा फाटा येथे कार व बैलगाडी यांच्यात अपघात

संगमनेर: आंबी खालसा फाटा येथे कार व बैलगाडी यांच्यात अपघात

Sangamner Accident between a car and a bullock cart at Ambi Khalsa Fata

Sangamner Accident | संगमनेर: नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे कारची बैलगाडीला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. तसेच बैलही जखमी झाले आहेत. हा अपघात दिनांक २१ शुक्रवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी उस तोड कामगार बैलगाडीतून महामार्ग ओलांडून आंबी खालसा येथे उस तोडण्यासाठी जात होते. दरम्यान कार क्रमांक १५ डी.एम. १६७८ पुणे येथून आळे फाटा मार्गे नाशिकच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान आंबी खालसा फाटा येथे कारची बैलगाडीला जोराची धडक बसली. यावेळी बैलगाडीतील दोघे जण जखमी झाले. यामध्ये लहान मुलीचाही समावेश आहे. यामध्ये दोन बैलही जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश लोंढे, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.  

Web Title: Sangamner Accident between a car and a bullock cart at Ambi Khalsa Fata

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here