संगमनेर: कारची काच फोडून सोन्याच्या दागिन्यांसह ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास
Ahmednagar News | Sangamner Theft | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कर्हे घाटात नाशिक पुणे महामार्गावर खंडोबा मंदिर परिसरात उभी असलेल्या कारची अज्ञात चोरट्यांनी काच फोडून सोन्याचे दागिनेसह ६८ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मारुती एकनाथ दराडे रा. राजापूर ता. येवला जि. नाशिक यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील कर्हे घाटातील खंडोबा मंदिर परिसरात मंगळवारी सायंकाळी त्यांची कार उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी मारुती दराडे यांच्या कारची चालक बाजूची काच फोडून कारमधील पर्समध्ये ठेवलेले दागिने रोख रक्कम व कागदपत्रे, चाव्या असा ऐवज एकूण ६८ हजार ७०० रुपयांचा लंपास केला.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एम. पठाण हे अधिक तपास करीत आहे.
Web Title: Sangamner Theft smashed car glass and stole Rs 68,000 along with gold jewelery