Home अहमदनगर नगर जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने या तारखेनंतरच शाळा उघडणार

नगर जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने या तारखेनंतरच शाळा उघडणार

Ahmednagar School Reopen this Date

Ahmednagar School Reopen | अहमदनगर: राज्य सरकारने ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या कमी आहे त्या भागात शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास दिले आहे. मात्र नगर जिल्ह्यात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सोमवार ऐवजी जिल्ह्यात 26 तारखेनंतरच शाळा उघडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला करोना रुग्णसंख्या वाढून तिसरी लाट सुरु झाल्यानंतर 8 जानेवारी 2022 पासून पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. मात्र, गेल्या काही दिवसात करोना रुग्णसंख्या स्थिरावल्यानंतर शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक आणि पालक वर्गाकडून होत होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे जवळपास 20 दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरु करण्यात येणार आहे. मात्र  ज्या भागात करोनाचे अधिक आहेत, त्याठिकाणी स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत. नगर जिल्ह्यातील करोना पॉझिटीव्हचा रेट हा 20 टक्क्यांच्या जवळपास असल्याने जिल्ह्यात 26 जानेवारीनंतर निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली.

Web Title: Ahmednagar School Reopen this Date

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here