Home संगमनेर Suicide | संगमनेर | तारेच्या सहाय्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Suicide | संगमनेर | तारेच्या सहाय्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner Suicide by strangling a lemon tree with the help of a star

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावच्या शिवारात तारेच्या सहाय्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या (Suicide ) केल्याची घटना शनिवारी (दि.१४ ) सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अशोक कोंडाजी जोशी (रा. नांदूर खंदरमाळ,संगमनेर ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  अशोक जोशी हे शुक्रवारी रात्री घराच्या समोर ओट्यावर झोपले होते. शनिवारी सकाळी घरातील सदस्यांना जोशी ओट्यावर दिसले नाही. त्यांनी घराच्या आजूबाजूला पाहिले असता जोशी यांनी लिंबाच्या झाडाला तारेच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. झाडावरून मृतदेह उतरवून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. अशोक जोशी यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. राहुल गोंधे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.

Web Title: Sangamner Suicide by strangling a lemon tree with the help of a star

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here