Home अहमदनगर Accident | महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यंत्रात अडकुन अपघातात, तरुण विवाहितेचा मृत्यू

Accident | महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यंत्रात अडकुन अपघातात, तरुण विवाहितेचा मृत्यू

Woman's sari gets stuck in Kadbakutti machine Accident young married woman dies

Ahmednagar | Newasa | नेवासा: नेवासा तालुक्यातील देवगाव येथे जनावरांसाठी कडबाकुट्टी करत असताना महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकल्याने झालेल्या अपघातात (Accident) एका तरुण विवाहितेचा अंत झाला आहे.  सरिता अजिनाथ गवते (वय 25 वर्ष) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सरिताच्या निधनाने देवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवगाव येथील सरिता गवते ही विवाहित महिला व पती आजिनाथ दोघे सकाळी सात वाजेच्या सुमारास जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना नजर चुकीने सरिताच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकला. त्यामुळे सरिता हीचे डोके मागील बाजूने कडबा कुट्टी यंत्रावर जोराने आदळल्याने डोक्याला मोठी जखम झाल्याने मोठा रक्तस्राव झाल्याने तिला उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात नेत असताना रुग्णालयाजवळ जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला..सरीताला तीन वर्षाचा मुलगा व अकरा महिन्याची लहान मुलगी आहे. देवगाव येथे शोकाकुल वातावरणात सरितावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Woman’s sari gets stuck in Kadbakutti machine Accident young married woman dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here