Home संगमनेर संगमनेर तालुक्यात तलाठी व कोतवाल रंगेहाथ लाचलुचपतच्या जाळ्यात

संगमनेर तालुक्यात तलाठी व कोतवाल रंगेहाथ लाचलुचपतच्या जाळ्यात

Sangamner Talathi and Kotwal Rangehath in the net of bribery

संगमनेर | Sangamner: तलाठी व कोतवाल या दोघांनी शेतकऱ्याकडून चार हजार रुपयांची लाच (Bribery) स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. वारसा हक्काची नोंद करण्यासाठी तलाठी स्वाती बबनराव झुरळे व कोतवाल संदीप लक्षमण पांडे रा. निमगाव जाळी ता. संगमनेर या दोघांना नाशिक विभागाच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. सदर रक्कम ही पांडे यांनी स्वीकारली तर ही रक्कम तलाठी बाई यांची असल्याचे समोर आले आहे.

या दोघांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत अधिक माहिती अशी की, निमगाव जाळी येथे एका तक्रारदाराच्या नातेवाईकाच्या वारसा हक्काची नोंद करायची होती. त्यामुळे तक्रारदार तलाठी कार्यालयात वारस हक्काची नोंद करण्यासाठी वारंवार चकरा मारत होता. मात्र तलाठी झुरळे रोज नवे कारण सांगून नोंद करण्यास टाळाटाळ करीत होत्या. ती वारसाहक्काची नोंद करण्यासाठी त्यांनी चार हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदार म्हणाले की, ज्याच्या नावावर जमीन आहे फक्त त्यांच्या वारस हक्काची नोंद करायची आहे. त्यासाठी पैसे कशासाठी द्यायचे मात्र पैशाशिवाय येथे काम होत नाही असे म्हणत त्यांनी चार हजार रुपयांसाठी त्यांनी कोतवाल मध्यस्थी घातला. मात्र तक्रारदार वैतागून त्यांनी थेट नाशिक लाचलुचपात विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून कोतवालाची झाडाझडती घेतली असता चार हजार रुपये आढळून आले. या दोघांना लाचलुचपत पथकाने बेड्या घातल्या आहेत.  

Web Title: Sangamner Talathi and Kotwal Rangehath in the net of bribery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here