Home संगमनेर संगमनेर तालुक्यात करोना हजार पार, आणखी २९ बाधित

संगमनेर तालुक्यात करोना हजार पार, आणखी २९ बाधित

Sangamner Taluka 28 new coronaviruses infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी सायंकाळी खासगी व रॅपिड अॅटीजेन टेस्ट द्वारे २९ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या करोनाबाधितांच्या संखेने १ हजार संख्या पार केली आहे.

रॅपिड अॅटीजेन टेस्ट द्वारे २६ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात शहरातील साळीवाडा येथे ५३, ५० वर्षीय पुरुष, परदेशीपुरा येथे ३८ वर्षीय पुरुष, रामनगर झोपडपट्टी येथे ३५ व २५ वर्षीय महिला, २ वर्षीय बालिका, इंदिरानगर ४३ वर्षीय महिला,जनतानगर येथे ५२ वर्षीय महिला यांना करोनाची लागण झाली आहे.

तालुक्यातून पिंपळे येथे ६०,३० वर्षीय पुरुष. १६ व ११ वर्षीय मुले ५०,४२,२२ वर्षीय महिला, १० महिन्याची बालिकेला करोनाची लागण झाली आहे, घुलेवाडी येथे ४८ व ३० वर्षीय महिला, ३० वर्षीय तरुण, ६ वर्षीय मुलगा, ३ वर्षीय मुलगी, गुंजाळवाडी येथे ६१,५०,२९ वर्षीय महिला, बोटा येथे ६५ व २७ वर्षीय महिला यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेतून तीन पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात साईनाथ चौक येथे ७५ वर्षीय महिला, २९ वर्षीय तरुण चावडी चौक येथे ३९ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली आहे. असे रविवारी दिवसभरात २९ करोना पॉझिटिव्ह आढळून तालुक्याची संख्या १००२ इतकी झाली आहे.

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner Taluka 28 new coronaviruses infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here