Akole: अकोले तालुक्यात करोनाचा पाचवा मृत्यू, एकूण २०५
अकोले | Akole: अकोले तालुक्यात करोनाने आणखी एक कोतूळ येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे.तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या २०५ इतकी आहे.
संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात हा ३४ वर्षीय तरुण कार्यरत होता. तो मूळ रहिवासी कोतूळ येथील आहे. दिनांक ७ ऑगस्ट रोजी त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. शनिवारी त्यास श्वास घेण्यास अधिक त्रास झाल्याने रविवारी सकाळी त्याच्या मृत्यूची वार्ता तालुक्यात धडकली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अकोले तालुक्यात करोनाने पाच रुग्णांचा बळी घेतला आहे.
वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Akole taluka 5th death coronaviruses