Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ४८३ करोना रुग्णांची वाढ
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ३८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ६२५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४.२५ टक्के इतके आहे.
शनिवार सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ४८३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थिती उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३३६७ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतून ४१ रुग्ण आढळून आले आहेत. यात मनपा २३, संगमनेर १,राहता १, नगर ग्रामीण १०, कॅन्टोनमेंट १, नेवासा २, शेवगाव १, कोपरगाव ४, जामखेड १० कर्जत २४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
रॅपिड अॅटीजेन चाचणीत २५७ रुग्ण आढळले आहेत. यात संगमनेर ३३, राहता २२, पाथर्डी ४८, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर ६, कॅन्टोनमेंट २१, नेवासा २१, श्रीगोंदा २१, पारनेर ११, अकोले ४, राहुरी १०, शेवगाव ९, कोपरगाव ४, जामखेड १०, कर्जत २४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत १८५ रुग्णांची नोंद झाली आहे. यात मनपा १४७, संगमनेर ९, पाथर्डी १, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर ३, कॅन्टोनमेंट ४, नेवासा १, श्रीगोंदा १, पारनेर २, अकोले २, राहुरी ५, शेवगाव १, कोपरगाव १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज ३८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले यात मनपा १७२, संगमनेर २३, राहता ३, पाथर्डी २७, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर १८, कॅन्टोनमेंट १३, नेवासा २१, श्रीगोंदा १८, पारनेर १०, अकोले ४, शेवगाव १४, कोपरगाव ३९, जामखेड ५, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Ahmednagar 483 news corona infected increased