Home महाराष्ट्र नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यामुळे ते काहीही बोलतात

नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यामुळे ते काहीही बोलतात

No one pays attention to Narayan Rane unless he speaks so he speaks anything

मुंबई: नाणारला पाठींबा देणाऱ्या शिवसेना पैसा कमाविणे हाच त्यांचा धंदा अशी टीका भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली होती.

नाणारला ८० टक्के लोकांचा पाठींबा असल्याचा दावा स्थानिक शिवसैनिकांनी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर नारायण राणे यांनी टीका केली होती. नाणार प्रकल्पाबाबत जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असे स्पष्ट त्यांनी केले आहे. नारायण राणे यांच्या या विधानानंतर मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी निशाना साधत टीका केली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्यामुळे ते काहीही बोलतात. नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. त्यामुळे ते अगोदर वेगळे नंतर वेगळे त्यांना त्यांच्या बोलण्याची टीआरपी वाढवायची असते. त्यांच्याकडे दुसरा काही कामधंदा राहिला नाही अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. गुलाबराव पाटील यांच्या या टिकेनंतर नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: No one pays attention to Narayan Rane unless he speaks so he speaks anything

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here