Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात ६४६ जण नवे करोनाबाधित

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात ६४६ जण नवे करोनाबाधित

Ahmednagar 646 new corona infected

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात शनिवारी ६४६ जण नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. पाथर्डी, कर्जत, भिंगार, नगर ग्रामीण, पारनेर, श्रीरामपूर या तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ९ हजार २४० इतकी झाली आहे. जिल्ह्यात १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयात करोना टेस्ट प्रयोगशाळेत ३९, अॅटीजेन टेस्ट मध्ये ३११ आणि खासगी प्रयोगशाळेत २९६ जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार २७४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी ५३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या ५ हजार ८६६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३.४८ टक्के इतके आहे.

शनिवारी ६४६ रुग्णांची भर पडली यात पारनेर ३१, अहमदनगर शहर २९७, नगर ग्रामीण भिंगारसह ५३, कोपरगाव १९, श्रीरामपूर ३३, नेवासा ९, संगमनेर १८, राहता १५, पाथर्डी ५८, श्रीगोंदा २२, अकोले २०, राहुरी २०, शेवगाव ७, कर्जत ३८ येथील रुग्णांची नोंद झाली आहे.  

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Ahmednagar 646 new corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here