Home संगमनेर संगमनेरात करोनाचा धमाका: आज तब्बल ३९ करोनाबाधित

संगमनेरात करोनाचा धमाका: आज तब्बल ३९ करोनाबाधित

Sangamner taluka 39 coronavirus infected

Sangamner| संगमनेर: तालुक्यात करोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आज खासगी प्राप्त अहवालात व रॅपिड अॅ टीजेन टेस्ट द्वारे तब्बल ३९ करोनाबाधित आढळून आले आहेत. 

आज प्राप्त झालेल्या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार शहरातील लालतारा सोसायटी येथील ६३ वर्षीय महिला, जनता नगर येथील ६८ वर्षीय महिला, कुंभार गल्ली येथे ४९ वर्षीय महिला, स्वदेश हॉटेल परिसरात ४३ वर्षीय पुरुष, तालुक्यातील कुरण येथील ५१ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ४३ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ५८ वर्षीय महिला, बोटा येथे ६९ वर्षीय पुरुष अशा आठ जणांचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. 

रॅपिड अॅ टीजेन टेस्ट द्वारे शहरातील विद्यानगर येथे ४१ वर्षीय महिला, जनता नगर येथील ४८ वर्षीय पुरुष, वाडेकर गल्ली येथे ५२ वर्षीय पुरुष, ऋणानुबंध मंगल कार्यालय परिसर येथे ४५ वर्षीय पुरुष, पपिंग स्टेशन परिसरातील ७२ वर्षीय महिला, साळीवाडा येथील ७६ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील ८६ व ४८ वर्षीय पुरुष, शहरातील ५२ वर्षीय पुरुष असा एकूण ११ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. 

तर तालुक्यात चंदनापुरी येथे ५४ वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील ३४ व ६२ वर्षीय महिला, १२ व १५ वर्षीय मुले, पिंपरणे येथे ४३, ४५ व ७० वर्षीय महिला, घुलेवाडी येथील २६ व २८ वर्षीय तरुण, २६ व २६ वर्षीय तरुणी, चिंचोली गुरव येथे २० वर्षीय तरुण ४४ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील ८२ वर्षीय वृद्ध, ढोलेवाडी येथे २७ व २२ वर्षीय तरुण, चिखली येथे ४८ वर्षीय पुरुष, निम्भाळे येथील ५८ वर्षीय पुरुष असा एकूण २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तालुक्यात एकूण करोना बाधितांची संख्या १०६३ इतकी झाली आहे.

Web Title: Sangamner taluka 39 coronavirus infected

Get Latest Marathi News  and Ahmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here