Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ५३ करोनाबाधितांची वाढ

Sangamner: संगमनेर तालुक्यात ५३ करोनाबाधितांची वाढ

Sangamner Taluka 53 corona infected increased 

संगमनेर | Sangamner: तालुक्यातून शनिवारी 53 करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची बाधितांची संख्या 3,723 वर पोहोचली आहे.

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील जानकीनगर येथे 43, 17 वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथून 52 वर्षीय पुरुष, अशोक चौक येथे 38 वर्षीय महिला, 20, 16 वर्षीय तरुण, बाजारपेठ येथून 21 वर्षीय तरुण बाधित आढळून आले आहेत.  

तर तालुक्यातील रुग्णांत गुंजाळवाडी पठार येथे 65 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालिका, कनोली येथे 34 वर्षीय पुरुष, साकुर येथील 39 वर्षीय महिला, 45,32 वर्षीय पुरूष, खराडी येथे 60 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 48, 34, 32, 26 व 23 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालिका, 34 वर्षीय पुरुष, कुरकुंडी येथील 65 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 65 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 42, 40,24 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 32 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण, 11 वर्षीय बालिका, 5 वर्षीय बालक,

शेडगाव येथील 80, 26 वर्षीय पुरुष, 73,45,20 वर्षीय महिला, पिंपरी येथे 32 वर्षीय महिला, हंगेवाडी येथे 70 वर्षीय महिला, चंदनापुरी मधील 33 वर्षीय पुरुष, आनंदवाडी येथे 58 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथे 66 वर्षीय महिला, 26 वर्षीय तरुण, पेमगिरी येथे 27 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी मधील 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, अकरा वर्षीय मुलगी, महालवाडी येथे 53 वर्षीय पुरुष, सोनोशी येथे 60 वर्षीय महिला, झोळे मधील 51,28 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा मधील 48 वर्षीय पुरुष असे 53 रुग्णांची वाढ झाली आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 3 हजार 723 इतकी झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Taluka 53 corona infected increased 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here