Home संगमनेर शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat Repeal anti-farmer and anti-labor laws

संगमनेर: केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे, त्यांच्यावर अन्याय करणारे असून फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत. हे काळे कायदे रद्द करावेत यासाठी संगमनेर तालुक्यात एक लाख सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेस ने राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून संगमनेर तालुका काँग्रेसने १ लाख स्वाक्ष-यांचे लक्ष्य निश्चित केले आहे. आज संगमनेर येथे या मोहिमेचा शुभारंभ केला.

या दोनही कायद्याविरोधात राज्यभर सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दोन कोटी सह्यांचे निवेदन कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Balasaheb Thorat Repeal anti-farmer and anti-labor laws

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here