संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांची गती झाली कमी
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बाधितांच्या संख्येत कमी झाली आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील बाधित संख्या कमी झाली आहे. बाधित संख्या कमी होत असल्याने संगमनेरकरांना दिलासा मिळाला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात १४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
शहरातील गणेशनगर येथील 49 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 65 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, इंदिरानगर 30 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, पंपींग स्टेशन भागातील 38 वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आला आहे.
आज प्राप्त अहवालातून सारोळे पठार येथे 65 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथे 56 वर्षीय व्यक्ती, शेडगाव मधील 41 वर्षीय पुरुष, अंभोरे येथे 12 वर्षीय मुलगा, खळी येथे 38 वर्षीय महिला, जोर्वे येथे 40 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथे 38 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 3 हजार 963 इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka corona speed Decreases