Sangamner: संगमनेर तालुक्यात बाधितांच्या कमालीची घट
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात दोन तर ग्रामीण भागातून सहा करोनाबाधित आढळून आले आहेत. रविवारी केवळ आठ रुग्ण आढळून आल्याने बाधितांची संख्या कमालीची घटलेली दिसून येत आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात नवीन नगर रोड येथे 70 वर्षीय महिला, ताजणे मळा येथे 56 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यात राजापूर येथील 29 वर्षीय महिला, 4 वर्षीय बालिका, रहिमपूर येथे 53 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 72 वर्षीय पुरुष, शेडगाव येथे 29 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथील 23 वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची करोनाबाधितांची संख्या 3 हजार 953 वर पोहोचली आहे.
तालुक्यात बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka Dercreses Corona infected