संगमनेर तालुक्यात धनगंगा पतसंस्थेत ४६ लाखांना गंडा
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेच्या काराभारांनी मोठा घोटाळा ठेवीदारांना मोठा गंडा घातल्याचे समोर आले आहे. पूर्वीच्या घोटाळ्यात आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापकाने स्वतःची तारण मालमता पतसंस्थेचे कर्ज न भरता परस्पर विक्री करण्यात आली तसेच ठेवीदारांच्या सोन्याच्या दागिन्यांची परस्पर विक्री करून पतसंस्थेला सुमारे ४८६०२८७ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तत्कालीन व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून आरोपी सचिन बजरंग कवडे याने पत्नी प्रणीता कवडे हिच्या नावावर कर्ज काढले होते. त्यासाठी त्यांची मालमत्ता पतसंस्थेकडे तारण म्हणून ठेवली होती. या कार्जास सचिन कवडे हा स्वतः जामीनदार झाला होता. त्यानंतर त्याने बँकेचे कर्ज न फेडता ही मालमत्ता परस्पर एका व्यक्तीला विकून टाकण्यात आली. त्याने बनावट दाखल्यांचा वापर करीत हा व्यवहार केला. तसेच ठेवीदारांनी बँकेत ठेवलेले सोन्याचे दागिन्यांची सचिन कवडे याने परस्पर विक्री केली. असे पतसंस्थेचे ४६ लाख ४७ हजार ३०७ रुपये व सोन्याचे २ लाख १२ हजार ९८० रुपयांना त्याने बँकेला गंडा घातला आहे.
याप्रकरणी लेखा परीक्षक अजय केशव राउत यांनी तपास करून सदर आरोपीविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर याप्रकरणी १० डिसेंबर रोजी आरोपी सचिन कवडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनगंगा पतसंस्थेत २०१८ मध्ये मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला होता. या संस्थेच्या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अटक करण्यात आली होती. कालांतराने काहींना जामीन मिळाला. मात्र जानेवारी २०१८ पासून सचिन कवडे हा अटकेत आहे. त्यास न्यायालयाने दीड कोटींचा जामीन ठेवला आहे. हि रक्कम न भरल्यामुळे त्याला जामीन मिळू शकला नाही. त्यातच काल पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Sangamner Taluka Dhanganga Patsanstha Fraud