Home संगमनेर संगमनेरात तरुणाने महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

संगमनेरात तरुणाने महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

Sangamner young man beat a woman

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात एका कापड दुकानात काम करणारी सेल्समन महिलेला अभंग मळा येथील राहणाऱ्या एका तरुणाने किरकोळ कारणास्तव घरात ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच त्या महिलेच्या अंगावरील कपडे फाडत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी ९ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पिडीत महिलेने संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून राहुल गुडवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादीच्या मुलाला आरोपीने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिला आरोपी राहुल गुडवाल यांच्याकडे गेली असता त्याने तिला मारहाण केली. या महिलेशी अपशब्दांचा वापर केला. त्यांच्या बाचाबाची झाली असता गुडवाल ने पिडीत महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

 केली. जर माझ्या नादाला लागशील तर तुला व तुझ्या मुलाला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. तसेच तिच्या अंगातील कपडे फाडत तू माझ्यासोबत घरात चल असे म्हणून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

Web Title: Sangamner young man beat a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here