Home कर्जत सख्या दिरानेच केला भावजयीवर बलात्कार, गुन्हा दाखल

सख्या दिरानेच केला भावजयीवर बलात्कार, गुन्हा दाखल

Karjat Ladies raped by Dir

कर्जत | Karjat: कर्जत तालुक्यात महिलेवर सख्या दिरानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. होलेवाडी येथील ३८ वर्षीय विवाहित महिलेवर चक्क दिरानेच बलात्कार केला आहे. याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथे पिडीत महिला ही आपल्या पती व मुलगा यांच्याबरोबर राहते. गुरुवारी सायंकाळी पती हे शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. यावेळी पिडीत महिला ही एकटीच घरात स्वयंपाक करण्याची काम करीत होती. त्यादरम्यान पिडीत महिलेचा दीर रफिक हा घरात येऊन महिलेला म्हणाला , विहिरीवरील मोटार चालू का केली. तू सतत मोटार चालू करत असतेस. तू काय माझी बायको आहे का असे म्हणत पिदितेला खाली पाडून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हे जर कोणाला सांगितले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आली.

सदर घटना पिडीतेने पती व जावई यांना सांगितली. याबाबत पिडीत महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहे.    

Web Title:  Karjat Ladies raped by Dir

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here