Home संगमनेर संगमनेर: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घुण खून

संगमनेर: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घुण खून

संगमनेर: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घुण खून

संगमनेर: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिल्यानंतर आरोपी पतीने तिच्या डोक्यात पाटा घालून निर्घुण खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे घडली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

शांता प्रकाश धांडे वय 32  असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की मयत शांता हिचे पहिले लग्न मोमेखेल तालुका संगमनेर येथील तरुणाशी झाले होते. मात्र त्यांच्यात न पटल्याने त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर शांता हिचे सहा महिन्यापूर्वी दुसरे लग्न प्रकाश नामदेव धांडे रा. आम्बेवंगण ता. अकोले याच्या सोबत जवळे बाळेश्वर येथील मंदिरात झाले होते. शांता व प्रकाश धांडे दोघेही श्रीगोंदा येथे एका वसतिगृहात कामाला असून जवळे बाळेश्वर येथे राहत होते. दरम्यान प्रकाश धांडे हि पत्नी शांता हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. याची माहिती शांता हिने आपल्या सासू सासर्यांना व आई गंगुबाई तिटकारे रा. मुबई यांना दिली. दरम्यान दिवाळीसाठी आई गंगुबाई तिटकारे व त्यांचे दुसरे जावई, मुलगी हे जावई प्रकाश धांडे यांची समजूत काढण्यासाठी रविवारी जवळे बाळेश्वर येथे आले . संध्याकाळी ४ वाजता जावई प्रकाश हा कामाकरिता राजापूर येथे गेला होता. त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सासू साडू व मेहुणी यांनी समजूत घातली. त्यानंतर सर्वांनी जेवण करून आपापल्या खोलीत झोपण्यास गेले. मध्यरात्री २ च्या सुमारास दुसरी मुलगी कांता हिने जोरा जोरात आरडाओरडा केल्याने सर्वजण जागे झाले. यावेळी मुलगी शांता हिच्या खोलीत सर्वांनी धाव घेतली असता शांता हि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. जावई प्रकाश याने पत्नी शांता हिच्या डोक्यात दगडी पाटा टाकून तिचा खून करून पळून गेला होता. त्यानंतर दुसरा जावई बाळू ह्याने गावात धाव घेत गावातील डॉ. भोईर यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले. डॉक्टरांनी तपासणी केली असता शांता हि मयत झाली होती असे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच पोलीस अधिकारी अशोक थोरात आणि इतर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

फिर्याद मयताची आई गंगुबाई तीटकारे यांनी घारगाव पोलिसात दिली. या फिर्यादीवरून घारगाव घारगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून घारगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  

Website Title: sangamner taluka news Unfolded murder by the character of the character


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here