Home क्राईम संगमनेरातील प्रकार: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

संगमनेरातील प्रकार: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Sangamner Taluka Unnatural abuse of a minor

संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एका गावात साडे सात वर्षीय अल्पवयीन मुलावर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून १६ वर्षीय मुलाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत साडे सात वर्षीय गावातीला जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात खेळत होता. यावेळी तेथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा आला. त्याने ७ वर्षीय मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेलगत बालवाडी असलेल्या बोळीत तो त्याला घेऊन जात तेथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Sangamner Taluka Unnatural abuse of a minor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here