Home क्राईम संगमनेर शहरात कुरियर कंपनीचे कार्यालय फोडले

संगमनेर शहरात कुरियर कंपनीचे कार्यालय फोडले

Sangamner Theft courier company's office was blown up

Sangamner Theft | संगमनेर: संगमनेर शहरातील अकोले रोड परिसरातील डिलिव्हरी कुरियर कंपनीचे कार्यालय चोरट्यांनी फोडून ४३ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिलिव्हरी कुरियर कार्यालयाचे व्यवस्थापक सागर राजेंद्र आळकुटे रा. माळी वाडा संगमनेर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत मुद्देमाल चोरून नेला. आतमधील वस्तूंची चोरी करण्यात आली आहे. एकूण ४३ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी. डी. सोनवणे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner Theft courier company’s office was blown up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here