Home क्राईम संगमनेर शहरातील घटना: दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले तब्बल ६ लाख रुपये

संगमनेर शहरातील घटना: दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले तब्बल ६ लाख रुपये

Sangamner Theft Rs 6 lakh taken from the trunk of a two-wheeler

संगमनेर | Theft: संगमनेर शहरातील संगमनेर कॉलेज अकोले बायपास रोडवर  Activa मोटारसायकलच्या डिक्कीतून ६ लाख रुपये अज्ञात दोन चोरट्यांनी लांबविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धर्मराज बाजीराव कासारे यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे. कासार हे एटीममध्ये पैसे भरण्याचे काम करतात. डिक्कीतून पैसे घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी धर्मराज कासार हे महिंद्रा कोटक बँकेतून ६ लाख रुपये काढून (यामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा होत्या)  ते आपल्या मोटारसायकलच्या (क्रमांक एम.एच.१५ इ. एन. ३६५३ )डिक्कीत ठेवून मोटारसायकलवरून जात होते.  त्यानंतर कासार हे संगमनेरमधून घुलेवाडीकडे जात होते त्याच दरम्यान कासार हे अकोले बायपासजवळ गाडी उभी करून त्याठिकाणी खरेदी करण्यासाठी थांबले असता त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलच्या डिक्कीतून सहा लाख रुपये घेऊन पळ काढला. यावेळी कासार आणि चोरटे यांच्यात झटापट झाली. कासार यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चोरट्यांनी मोटारसायकलवरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात चोरटे दिसून आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

संगमनेर शहरात भरदिवसा चोरीच्या घटना वाढताना दिसून येत आहे. पोलिसांचा चोरट्यांवर वचक दिसून येत नसल्याने ह्या घटना घडत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे.

Web Title: Sangamner Theft Rs 6 lakh taken from the trunk of a two-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here