Home अकोले खळबळजनक: संगमनेर तालुक्यात पाझर तलावात आढळला मृतदेह, अकोलेतील युवक

खळबळजनक: संगमनेर तालुक्यात पाझर तलावात आढळला मृतदेह, अकोलेतील युवक

Body found in Pazhar Lake in Sangamner taluka youth from Akole

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पाठ्र्भागातील खंदरमाळवाडी गावात असलेल्या माहुली येथील पाझर तलावात एका युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील गणेश तुकाराम घोडेकर वय ३५ असे या युवकाचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गणेश घोडेकर हे अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील रहिवासी आहेत. भाऊबीजेच्या दिवशी माहुली येथील  शंकर नाथा वाकचौरे या पाहुण्यांकडे आले होते त्यानंतर कामाला जातो असे सांगून गेले होते. मात्र मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना परिसरातील नागरीकांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नागरिकांनी या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली.

माहिती मिळताच सहाय्यक फौजदार राजू खेडकर, गणेश लोंढे, राजेंद्र लांघे, रामनाथ कजबे, पोलीस पाटील कुंडलीक साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम कजबे यांसह आदिंनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर रूग्णवाहीकेला बोलावून गणेश घोडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

याबाबत शंकर वाकचौरे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहे.

Web Title: Body found in Pazhar Lake in Sangamner taluka youth from Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here