चोरटे एटीएम मशीन चोरून नेत असताना पोलिसांच्या गाडीचा सायरन वाचताच
श्रीगोंदा | Theft: श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावात भर वस्तीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम तीन ते चार चोरट्यांनी फोडून पोबारा केला. ते मशीन घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी एटीएम मशीन रस्त्यातच टाकून पोबारा केला आहे.
या मशीनमध्ये अंदाजे सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी विश्वास पोपट कसबे यांनी फिर्याद दिली आहे.
श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशियतास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एका आरोपीला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक आण्णा जाधव, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली.
Web Title: Theft was stealing the ATM machine, he read the siren of the police car