Home अहमदनगर Sangamner: पत्नीच्या चारित्र्याच्या संशियातून तिला जीवे मारण्याची धमकी

Sangamner: पत्नीच्या चारित्र्याच्या संशियातून तिला जीवे मारण्याची धमकी

Sangamner to kill her out of suspicion of his wife's character

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रहिवासी असलेलल्या विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या विवाहितेच्या फिर्यादीवरून आश्वी पोलिसांनी सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार नाशिक येथे मी, माझे पती, सासरे नणंद असे राहत आहे. घरांमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून सातत्याने वाद सुरु होते. त्यामुळे ही महिला माहेरी आली. त्यांनतर सासरची मंडळी घरी येऊन त्यांनी तिचे जुने मोबाईल मधील फोटो दाखवत आमची सून वागण्यात व्यवस्थित नाही. असे नातेवाईक यांना सांगितले. तसेच तिची बदनामी करण्यासाठी अनेक वाईट गोष्टी सांगण्यात आल्या.

यावेळी पती स्वप्नील सापनर, सासरे प्रकाश सापनर, सासू संगीता सापनर रा. नाशिक गोरक्षनाथ सापनर, चुलत सासू प्रज्ञा सापनर रा. मुंबई, चुलत सासरे भागवत सापनर, चांगदेव सापनर रा. नाशिक यांनी या महिलेस शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. पतीने नंद्वणार नसल्याची धमकी दिली. गावात काही निवडक फोटो दाखवून महिलेची बदनामी करण्यात आली. या तक्रारीवरून वरील सात जणांवर आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner to kill her out of suspicion of his wife’s character

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here