Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचा विवाह: चार जणांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विवाह: चार जणांवर गुन्हा दाखल

Shrigonda Marriage of a minor girl

श्रीगोंदा | Shrigonda: तालुक्यातील चिखली येथील एका मुलीचा विवाह केल्याप्रकरणी शुक्रवारी बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक १६ वर्षीय मुलगी तिच्या बहिणीकडे लोणी व्यंकनाथ येथे राहत होती. मागील आठवड्यात तिचे नातेवाईक यांनी तिला कपडे घेऊन येतो असे सांगून तिला घेऊन गेले. त्यानंतर दोन दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी मुलीचा विवाह मढेवडगाव येथील एका तरुणाशी लावून दिल्याचे सांगितले.

याबबत त्या मुलीची बहिण हिने  श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी तत्परतेने ती मुलगी व तिचे नातवाईक यांना बोलावून घेऊन विचारणा केली तेव्हा मुलीचे लग्न झाले नसून केवळ साखरपुडा झाल्याचे त्यांनी लेखी लिहून दिले.

खबरदारी उपाय म्हणून पोलिसांनी त्या मुलीला नगर येथील शासकीय बाल सुधारणागृहाकडे रवाना केले. त्याठिकाणी त्या मुलीचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी त्या मुलीने बाल कल्याण समितीसमोर आपला साखरपुडा नाही तर विवाह झाल्याचे कबुल केले.

या संस्थेचे प्रवीण कदम, पूजा पोपळघट यांनी पोलीस स्टेशन गाठले. तेथे फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विशाल जगन्नाथ माने रा. मढेवडगाव,  सागर काळे, शीतल सागर काळे रा काळेवाडी ता. नगर, दत्तात्रय बाबा झेंडे रा. चिखली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Shrigonda Marriage of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here