Home क्राईम संगमनेर: भावाच्या डोक्यात रॉड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

संगमनेर: भावाच्या डोक्यात रॉड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sangamner Trying to kill his brother by putting a rod 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास तु माझ्या दारू व्यवसायाची माहिती पोलिसांना का देतो? आता तुझा काटा काढतो असे म्हणत भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश माधव मुळे रा. धांदरफळ असे या जखमी झालेल्याची नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमेय माधव मुळे रा. धांदरफळ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश मुळे यांचे मित्र भाऊसाहेब संपत कानवडे यांनी रस्त्याच्या कडेला त्यांची दुचाकी उभी केली होती. अमेय मुळे हा या दुचाकीचे नुकसान करत होता. त्यावेळी परेश मुळे यांनी अमेय मुळे याला तु माझ्या मित्राची गाडी का फोडतो असे विचारले असता त्याने तु मध्ये का आलास तु माझ्या व्यवसायाची माहिती पोलिसांना का देतो. तुझा काटा काढतो. असे म्हणत त्याने परेश मुळे याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.   

Web Title: Sangamner Trying to kill his brother by putting a rod 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here