Home संगमनेर संगमनेर: चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या छळास कंटाळून महिलेची आत्महत्या

संगमनेर: चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या छळास कंटाळून महिलेची आत्महत्या

Sangamner Woman commits suicide after being harassed by her father-in-law

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजामपूर येथील एका विवाहित महिलेने गुरुवारी रात्री विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविले. चारित्र्याच्या संशयावरून सासरच्यांकडून तिचा छळ होत असल्याने छळास कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

शारदा जयराम गीते असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात मयत शारदा हिचे वडील दगडू सानप यांनी फिर्याद दाखल केली असून पती जयराम चांगदेव गीते व भाया संतोष चांगदेव गीते यांच्या विरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वडिलांनी दिलेल्या  फिर्यादीनुसार पती जयराम गीते व भाया संतोष गीते हे दोघे जण चारित्र्याच्या संशायावरून तिला मारहाण करीत असे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२० मध्ये पती विरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर नातेवाईक यांच्या मध्यस्थीने ती पुन्हा नांदायला गेली होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने ती रुग्णालयात नोकरी करत होती. मात्र चारित्र्याच्या संशयावरून तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले.

दोन दिवसांपूर्वी मुलगी व तिचा पती हे हजारवाडी येथे भेटायला आले होते. यावेळी माझे पाय दुखत असल्याने जयराम याने मुलगी शारदा हिला माझ्यासोबत दवाखान्यात जणू=जाण्यासाठी सोडून गेले होते. दवाखान्यातून आल्यानंतर तिला नवीन मोबाईल घेऊन दिला. तिला सासरी पिंप्री लौकी येथे सोडले. हा फोन घेणे आरोपींना पसंत पडले नाही त्यांनी तिला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. शारदाने गुरुवारी मध्यरात्री विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Sangamner Woman commits suicide after being harassed by her father-in-law

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here