Home अहमदनगर अपहरण झालेल्या हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह आढळला

अपहरण झालेल्या हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह आढळला

body of the abducted Gautam Hiran was found

श्रीरामपूर | Shrirampur: मागील सहा दिवसांपासून बेलापूर येथील अपहरण झालेल्या गौतम हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह एमआयडी सी तील परिसरात रेल्वे मार्गाच्या कडेला आढळून आला आहे. रविवारी सकाळी हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.   

हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अपहरणकर्त्यांनी घातपात केल्याची शक्यता वाटत आहे. त्यांच्या अपहरणाचा मुद्दा राज्याच्या अधिवेशनात चर्चेला गेला होता. मात्र पोलिसांना शोधून काढण्यात अपयश आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्या अपहरणाची माहिती घेतली. यासाठी चार पथके रवाना करण्यात आली होती, मात्र उपयोग झाला नाही. पोलिसांना अपहरण करण्यामागचे कारण अजून समजू शकले नाही. तपासाची दिशा निश्चित करता आली नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका गाडीचा तपास केला मात्र त्यात काही तथ्य आढळून आले नाही. यामध्ये पोलिसांचा वेळ वाया गेला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अधिवेशनात गृहमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: body of the abducted Gautam Hiran was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here