Home संगमनेर Sangamner: संगमनेर शहरात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग

Sangamner: संगमनेर शहरात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग

Sangamner Woman molested by doctor

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात एका डॉक्टरने महिलेचा पाठलाग करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉक्टरवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात राहणारी एक विवाहिता उपचारासाठी डॉ. इरफान अली शब्बर अली शेख यांच्याकडे जात होती. शेख हा डॉक्टर या महिलेचा फॅमिली डॉक्टर होता. या विवाहीतेबाबत डॉक्टरच्या मनात वाईट भावना निर्माण झाल्याने त्याने तिचा वारंवार पाठलाग सुरु केला.

बुधवारी त्याने तिचा हात पकडून विनयभंग केला. याबाबत विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलीं असून यावरून पोलिसांनी आरोपी डॉ. शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संगमनेर न्यायालयासमोर उभे केले असता त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल टोपले हे करीत आहे.   

Web Title: Sangamner Woman molested by doctor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here