दुधात भेसळ, अन्न औषध प्रशासनाचा दुध केंद्रावर छापा
राहुरी | Rahuri: दुध संकलन केंद्रावर बुधवारी सकाळी अन्न, औषध प्रशासनाने छापा टाकत भेसळयुक्त दुध व पावडर जप्त करण्याची घटना राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील दोन केंद्रावर उघडकीस आली आहे. या कारवाईमध्ये ३६ हजार ६३१ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
शिलेगाव परिसरात करमारवाडी येथे व्हेटर्नरी डॉक्टर असलेला दिलीप रघुनाथ म्हसे यांच्या मे. गोरक्षनाथ दुध संकलन केंद्रावर पथकाने छापा टाकला. तेथे १०० किलो व्हे पावडर व ४० ली. व्हे पावडरचे द्रावित ३०० ली. दुध आढळून आले.
तसेच जवळच असलेल्या रमेश पाटीलबा यांच्या मे. म्हसे पाटील संकलन केंद्राची तपासणी केली. तेथे १५ किलो व्हे पावडर व ३०० ली. भेसळयुक्त दुध आढळून आले.
या पथकाने दुध व व्हे पावडर यांचे नमुने विश्लेनासाठी घेतले आहेत. भेसळयुक्त दुध जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. हे दोनही दुध संकलन केंद्र बंद करण्यात आले आहे.
Web Title: Rahuri Food and Drug Administration raids milk centers