Home अकोले Suicide | संगमनेरच्या तरुणाची अकोले तालुक्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Suicide | संगमनेरच्या तरुणाची अकोले तालुक्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner youth commits suicide by hanging himself from a tree in Akole

Akole | अकोले:  संगमनेर तालुक्यातील तरुणाने अकोले तालुक्यातील विठा घाटात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide ) केल्याची घटना घडली आहे. कृष्णा सुभाष कोटकर वय २७ (रा. खराडी ता.संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.या तरुणाने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हार – घोटी राज्यमार्गावरील विठा घाटात कोतुळ फाट्याचे बाजूला एका झाडाला एका पुरुषाचे लटकलेले अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलीस पाटील दत्तात्रय भागाजी वाकचौरे यांनी पोलिसात खबर दिल्यावरुन चौकशी केल्यावर मुतदेहाच्या खिशात आधार कार्ड सापडल्यावरुन कृष्णा सुभाष कोटकर वय २७ (रा. खराडी ता.संगमनेर) अशी ओळख पटली आहे. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास स.पो.नि.नरेंद्र साबळे हे करीत आहे.

Web Title: Sangamner youth commits suicide by hanging himself from a tree in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here