Home संगमनेर Rape | संगमनेरात नात्याला काळीमा! भाच्याने मामीसह केला तिच्या मुलीवरही बलात्कार

Rape | संगमनेरात नात्याला काळीमा! भाच्याने मामीसह केला तिच्या मुलीवरही बलात्कार

Sangamner niece rape her daughter along with her aunt

Ahmednagar  Rape Case: अहमदनगर जिल्ह्यात मामी भाचा या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक बलात्काराची (Rape)घटना वडगाव पान येथून समोर आली आहे. 32 वर्षीय मामीवर आणि मामीच्या अल्पवयीन मुलीवर भाच्याने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना बुधवार दि. 27 एप्रिल 2022 व वर्षभरात वेळोवेळी झाल्याचे पीडितेच्या सांगण्यावरून लक्षात आले आहे. याप्रकरणी खुद्द मामीने आपल्या भाच्याच्या विरोधात 2 मे रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या नराधम भाच्यास संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

याबाबत अधिक अशी की, संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एक कुटुंब राहत होते. त्यांना एक मुलगी होती. त्याच परिसरात पिडीत महिलेची नणंद असल्याने त्यांचे नेहमी घरी येणे जाणे होते. पिडीत महिलेचा भाचा देखील वेळोवेळी घरी येत जात होता. पण, हळूहळू त्याची नियत मामीवर फिरली.

भाचा एकदिवस मामीच्या घरी आला व त्याने तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. व धमकी देत तो म्हणाला की, तू माझी इच्छा पुरी केली नाहीतर मी तुझ्या मुलीला व नवऱ्याला ठार मारील अशी धमकी दिली. त्यामुळे त्याच्या दबावाला आणि धमक्यांना मामी बळी पडली. नराधम भाच्याने या धमकीचा फायदा उचलत मामीच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला.

दरम्यान, तो नराधम भाचा मामीच्या घराकडे वेळोवेळी येऊ लागला. त्याला चांगलीच चटक लागली होती. त्यामुळे, या नराधमाची नजर मामीच्या अल्पवयीन मुलीवर देखील पडली. आरोपी भाचा याची काल मामीवर असणारी नजर आता त्याच घरात असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर देखील नेहमी पडत होती. मात्र, एक जवळचा विश्वासू व्यक्ती म्हणुन त्याच्यावर कोणी काही शंका घेतली नाही. मात्र, सगळ्यांना चुकवून त्याची तिच्यावर कायम वाईट नजर होती. बुधवार दि. 27 एप्रिल रोजी सर्वजण रात्री जेवण करून झोपले होते. तेव्हा 12:30 वाजण्याच्या दरम्यान आरोपी भाच्याने घरात शिरकाव करत  अल्पवयीन मुलीला पाहुन या नराधमाची नियत फिरली आणि घरात एकांत पाहुन त्याच्यातील वासनांध राक्षस जागा झाला. आणि त्याने अल्पवयीन मुलीच्या बिछान्यात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

दरम्यान, हे पीडित मुलीच्या आईने पाहिले असता त्यांनी आरोपीला विरोध केला. पण, आरोपी भाच्याने पिडीत मामीला धमकी दिली. तुझे व्हिडीओ तयार करून व्हायरल करील. असे म्हणून पुन्हा नराधम भाच्याने मामीवर अतिप्रसंग केला. हा सर्व अत्याचारी व हतबल थरार झाल्यानंतर आरोपी म्हणाला की, हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या नवऱ्याला व मुलीला ठार मारून टाकील अशी धमकी देत निघुन गेला. मात्र, पिडीत मामीचा राग अनावर झाला. त्यांनी आपल्या नराधम भाच्याला पाठीशी न घालता थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली.

Web Title: Sangamner niece rape her daughter along with her aunt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here