Home संगमनेर संगमनेरात हॉटेल फोडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला

संगमनेरात हॉटेल फोडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला

Breaking News | Sangamner: हॉटेल सम्राट फोडून दुकानातील सुमारे १ लाख ४२ हजार ३२० रुपये किमतीची विदेशी दारुच्या खोक्यांची चोरी (Theft).

Sangamnerat, a hotel was broken into and goods worth one and a half lakh rupees were theft

संगमनेर: नाशिक रस्त्यावरील कालडा बंधूंचे हॉटेल सम्राट फोडून दुकानातील सुमारे १ लाख ४२ हजार ३२० रुपये किमतीची विदेशी दारुच्या खोक्यांची चोरी झाली. मात्र ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी कोंची येथील एका हॉटेलमध्ये चोरून आणलेली दारू विकताना चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे-नाशिक रस्त्यावर गुंजाळवाडी शिवारात कालडा बंधूंचे हॉटेल सम्राट आहे. या हॉटेलमध्ये बुधवारी रात्री अज्ञात चोरट्याने स्वयंपाकगृहाच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि हॉटेलमधील ६८ हजार ८०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या, ४८ हजार रुपये किमतीचे विदेशी दारुचे पाच खोके, ५ हजार ५२० रुपये किमतीच्या बिअरच्या बाटल्या आणि २० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ४२ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

हॉटेलचे मालक अशोक कालडा हे गुरुवारी सकाळी हॉटेल उघडण्यासाठी आले असता त्यांना स्वयंपाकगृहाच्या बाजूने दरवाजा तुटलेला आढळून आला. त्यानंतर त्यांनी ही माहिती त्यांचा या मुलगा सुरज कालडा यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता विविध विदेशी दारू, बिअरच्या बाटल्या आणि गल्ल्यातील रोख रक्कम गायब झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती पोलिसांना देताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत सागर कालडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तपासात हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Sangamnerat, a hotel was broken into and goods worth one and a half lakh rupees were theft

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here