Home अहमदनगर कोपरगावात तिघांचे मृतदेह आढळले

कोपरगावात तिघांचे मृतदेह आढळले

Breaking News | Ahmednagar: तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळून आले, उष्माघाताचे बळी असल्याचा संशय.

Three dead bodies were found in Kopargaon

कोपरगाव:   उष्णतेच्या लाटेने राज्यात होरपळ सुरूच असून सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिकांची लाही लाही होताना दिसत आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळून आले असून उष्माघाताने २४ तासांत हे ३ बळी गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोपरगाव शहरात काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. शहरातील गोदावरी नदी वरील मोठ्या पुलाच्या खाली बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वर्ष वय  असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. गुरुवारी २३ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या जाधव हॉस्पिटलच्या मागील मोकळ्या जागेत ६० ते ६५ वर्ष वय असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच नगर- मनमाड महामार्गाच्या कडेला तिनचारी नजीक दुपारी तीन वाजेच्या सुमारास ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर तीनही मृत्यू हे उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते असून त्या तीनही मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. सदर तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीनही इसमांचा मृत्यू कोणत्या कारणानी झाला याचा पुढील तपास पो. नि. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहे. सध्या राज्यातील उष्णतेची लाट पाहता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे बनले आहे.

Web Title: Three dead bodies were found in Kopargaon

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here